Tuesday, October 11, 2005

विजयादशमी

माझ्या ब्लॉग च्या सर्व वाचकांना विजयादशमीच्या हार्दीक शुभेच्छा!!!

हा लेख (आता ह्या लिखाणास "लेख" म्हणणे ही जरा अतीशयोक्ती आहे हे मला मान्य आहे, परंतु सध्यातरी मला "post" साठी पर्यायी मराठी शब्द सुचतनाही) मराठी मधून लिहिण्याचे कारण की आज दिवसभरात मला दसऱ्याच्या ज्या शुभेच्छा मिळाल्या, त्यातल्या जवळपास सर्व इंग्रजी मधून. विजयादशमी हा पाश्चात्य सण आहे की काय असे वाटू लागले!. अमेरिकेत आल्यापासून ह्या वैशिष्ट्यपूर्ण सणांची उणीव भासते आहे, आणी त्यात दोन मराठी माणसं एकमेकाला "Happy Dussehra" म्हणत आहेत हे पाहुन काहीतरी चुकल्या सारखे वाटले. तेव्हा ठरवले, आज तरी सर्वांना शुभेच्छा आपुल्या मायबोलीतूनच द्यायच्या. रोजच्या वागण्या-बोलण्यात इंग्रजी चा प्रभाव दिवसागणीक वाढत असताना आपली मातॄभाषा जपण्याचे कर्तव्य आपणा सर्वांवर आहे. तेव्हा आजच्या ह्या शुभमुहूर्त्तावर विनाकारण इंग्रजीचा वापर टाळण्याचा निश्चय करावा आणी सर्व आप्तजनांस "Happy Dussehra" च्या ऎवेजी विजयादशमीच्या शुभेच्छा द्याव्या ही विनंती!


जय मराठी, जय महाराष्ट्र!!



मगाशी "blog" असा अपरीहार्य शब्द्शः वापर झाला ह्याची मला खंत लागून आहे,पण मी अजून "post" प्रमाणेच "blog" च्याही पर्यायी शब्दाच्या शोधात आहे. कुणास सुचल्यास अवश्य कळवावे :), आणी हो, तुम्ही जर हा मचकूर Firefoxमध्ये वाचत असाल तर संभवतः काना, मात्रा आणी वेलांट्या ह्यांची भरपूर अदलाबदल झालेली आढळेल... कारण Firefox चे देवनागरी अजून कच्चे आहे :). देवनागरी साठी (आणी केवळ तेवढ्या एका कारणासाठी :)) Internet Explorer चा वापर करावा :)

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home